रक्षकच बनला भक्षक, पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

42

सामना प्रतिनिधी । नाशिक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे एका १५वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या भायखळा पोलीस स्टेशनचा शिपाई गोरख शेखरेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

गोरख मधुकर शेखरे (२५) हा मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो पूर्वी मोहाडीत तर, सध्या दिंडोरीत राहतो. रजेवर गावी आलेला शेखरे काल मोहाडीत आला, अल्पवयीन मुलीच्या चुलत भावाशी त्याची मैत्री होती, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुलगी घराबाहेर भांडी घासत असताना त्याने तिला बाथरूममध्ये नेत अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिंडोरी पोलीस ठाणे गाठले, मुलीच्या फिर्यादीवरुन नराधम शेखरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगवीरी पहाटे सवाचार वाजता त्याला दिंडोरी येथून अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या