दिल्ली पुन्हा हादरली, महिलेचा हात पकडून हस्तमैथून

37

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निर्भया प्रकरणानंतरही देशाची राजधानी दिल्ली महिलासांठी सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. ताज्या घटनेमध्ये दिल्लीतील सर्वात पॉश समजल्या जाणाऱ्या कनॉट प्लेस भागामध्ये महिलेसोबत छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या भागात असणाऱ्या एका ऑफिसच्या छतावर अज्ञात व्यक्तीने हात पकडत हस्तमैथून केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञाताविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनॉट प्लेस भागामध्ये एक महिला जेवणानंतर ऑफिसच्या छतावर शतपावली करण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान एक अज्ञात व्यक्ती तिच्या मागोमाग छतावर पोहोचली. अज्ञात व्यक्तीने आपल्याकडे अत्यंत वाईट नजरेने पाहत होती आणि नंतर माझ्याजवळ येत लगट करण्याचा प्रयत्न करू लागली असे पीडितेने पोलिसांना सांगितले. आरोपीने माझ्याजवळ येत शरिराच्या वरच्या भागाला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्याला मागे ढकलत आणि मी दरवाजाकडे पळत गेले. मात्र आरोपीने छताचे दार बंद केले होते. त्यानंतर त्या व्यक्तीने माझ्या जवळ येत हात पकडला आणि पँटची चैन उघडून हस्तमैथून करू लागला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

पीडितेने आरोपीला पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. तरीही त्याने लज्जास्पद प्रकार सुरू ठेवला. त्यानंतर पीडित महिलेने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केल्यावर आरोपीने महिलेचा मोबाईल ओढत दुसऱ्या छतावर उडी घेतली आणि फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या