पोलीस जवानांनी वाचविले गायीच्या बछड्याचे प्राण

41

सामना वृत्तसेवा । गडचिरोली

एरव्ही नागरिकांच्या संरक्षणाकरिता नेहमीच तत्पर असलेला पोलीस विभाग प्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तेवढ्याच तत्परतेने पूर्ण करतो याची प्रचिती स्थानिक पोलीस स्टेशनच्या जवानांच्या तत्परतेने दृष्टीपथास आली. स्थानिक पोलीस विभागाच्या जवानांनी पोलीस स्टेशनसमोर वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या गायीच्या बछड्यावर तात्काळ उपचार केल्याने पोलीस जवानांमध्ये असलेले पशूप्रेम जनसामान्याच्या प्रत्ययास आले.

दुपारच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरील मुख्य मार्गावर एका वाहनाने धडक दिल्याने गायीचा बछडा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतच सदर बछड्याने पोलीस ठाण्यातच धाव घेतली. पोलीस ठाण्यातील जवानांना सदर बछड्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. तात्काळ पोलीस जवानांनी स्थानिक पशुचिकित्सालयाशी संपर्क साधून पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच पाचारण केले. यावेळी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस जवानांच्या सहाय्याने बछड्यावर तात्काळ उपचार केले. पोलीस ठाण्यातील जवानांच्या तत्परतेने गायीच्या बछड्याचे प्राण वाचले.

आपली प्रतिक्रिया द्या