परळीत ठरत असलेला बालविवाह पोलिसांनी हस्तक्षेप करत रोखला

973

मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असतानाही ठरत असलेल्या विवाहाला थांबवत परळी पोलिसांनी हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. बालविवाह ठरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत ठरत असलेला हा बालविवाह थांबवला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरकत नगर भागात एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी तातडीने या भागात धाव घेत संबंधितांची चौकशी केली.

या चौकशीमध्ये हा विवाह होणार नसल्याचे सांगण्यात आले. केवळ विवाहाची बोलणीच झाली असल्याचे दोन्ही बाजूकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील लोकांना समज दिली. तसेच त्यांच्याकडून बालविवाह करणार नसल्याचे लेखी घेण्यात आले. बालविवाहाची माहिती कळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आरती जाधव यांनी तत्परतेने ही कारवाई केल्याने होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या