वयाचा दाखला पाहिला आणि तिला शबरीमला मंदिरात जाण्यापासून रोखलं

475
sabarimala-temple

दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या एका मुलीला रोखण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शबरीमला मंदिरात आपल्या कुटुंबीयांसोबत आलेल्या मुलीच्या वयाची खातरजमा केल्यानंतर तिचं वय 12 वर्ष असल्याचं समोर आलं. अखेर मंदिराच्या नियमाप्रमाणे तिला प्रवेशापासून रोखण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबर 2018 च्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आता 7 न्यायमुर्तीच्या पीठाकडे पाठवण्यात आले आहे. शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशास मनाई आहे. याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रेवेश देण्याचे आदेश दिले होते.

या आधी शनिवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर 10 महिलांना प्रवेशासाठी रोखण्यात आले. केरळ पोलिसांना पंबा बेस कॅम्पजवळ या महिलांचे ओळखपत्र तपासल्यावर त्या 10 ते 50 वयोगटातील असल्याचे आढळल्याने त्यांना प्रवेशास मनाई करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या