पोलिसांना मूळ वेतनाच्या दोनशेपट गृहकर्ज

20

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱया पोलिसांचे आयुष्य सरकारी निवासस्थानातच निघून जाते. म्हणून पोलिसांना खासगी घर घ्यायचे असल्यास त्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २०० पट गृहकर्ज सरकार उपलब्ध करून देणार आहे. तसेच या व्याजावर सबसिडीही देण्याचे प्रयत्न केले जातील. ही घरे उपलब्ध करून देणाऱ्या विकासकांना अडीच एफएसआय देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देशातील पहिल्या स्मार्ट पोलीस ठाणे व पोलीस गृहबांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर ते बोलत होते.

– राज्यात एक लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी ४७ हजार घरांचे नियोजन केले आहे. त्यापैकी १० हजार घरांचे बांधकाम सुरू असून तीन हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित सात हजार घरांची निर्मिती प्रगतिपथावर आहे.

जे पोलीस २४ तास सेवा देऊन आपले कर्तव्य पार पाडतात त्यांच्या शासकीय निवासस्थानांची आज दुरवस्था झाली आहे. मागील ४० वर्षांत पोलीस भरती झाली पण त्यांच्या निवासस्थानांकडे दुर्लक्ष झाले. त्यांची ही दुरवस्था पाहून मोठय़ा प्रमाणात घरांची उभारणी करण्याचे ठरविले आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आपली प्रतिक्रिया द्या