पेट्रोलियम मंत्र्यांसमोर काँग्रेसची पेट्रोल दरवाढ विरोधात निदर्शने

केंद्रीय  पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप एस. पुरी यांची शुक्रवारी 23 सप्टेंबर रोजी एनडी हॉटेल येथे पत्रकार परिषद होती. दरम्यान काँग्रेसच्या वतीने पेट्रोल दरवाढ विरोधात निदर्शने करण्यात आली.

चंद्रपूर शहर काँग्रेसच्यावतीने एनडी हॉटेल समोर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मागील काही वर्षांत इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या वतीने दरवाढ कमी करण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या जाताना दिसत नाही. अशात केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.