नव्या संसदेतील लोकसभा सभागृहात गेल्या 13 डिसेंबर रोजी घुसखोरी करणाऱया सहा जणांवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालवण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे.
2001 च्या संसदेवरील हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त 13 डिसेंबर 2023 रोजी दोन व्यक्तींनी सार्वजनिक गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली होती आणि पिवळय़ा रंगाचा धूर सोडणारी नळकांडी पह्डली होती. यामुळे खासदारांमध्ये घबराट पसरली होती. संसदेबाहेरील पदपथावरही धुराचे नळकांडे पह्डून एका युवतीने निदर्शन केले होते. या प्रकरणात मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम रानोलिया, ललित झा आणि महेश कुमावत हे सहा जण आरोपी आहेत.