वायू प्रदूषणामुळे हाड ढिसूळ होण्याचा धोका

42
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
वायू प्रदूषणामुळे श्वसनाशी संबंधित आजार, त्वचा रोग आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार तर होतातच. पण एका संशोधनात वायू प्रदुषणामुळे हाडं ठिसूळ होत असल्याचेही समोर आलं आहे. वायू प्रदुषणामुळे शरीरातील खनिजांचं प्रमाण कमी होऊन हाडं ठिसूळ होतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिस (हाडांशी संबंधित विकार) बळावतो असं द लॅन्सेट प्लॅनेटरी या आरोग्य पत्रिकेत म्हटल आहे.
या पत्रिकेत हाड तुटणाऱ्या घटनांसंबधी वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यात हाड ठिसूळ होण्याच्या, तुटण्याच्या अनेक कारणांमध्ये वायू प्रदूषण हे देखील मुख्य कारण असल्याच नमूद करण्यात आलं. तसेच वायू प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये हाड ठिसूळ होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अस या संशोधकांचं म्हणणं आहे. अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातील मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अँड्रिया बेक्वेरली यांनी देखील वायू प्रदुषणामुळे हाडं ठिसूळ होत असल्याला दुजोरा दिला आहे. शुद्ध वायूमुळे हाडं बळकट राहतात तर प्रदूषणामुळे कमकुवत होतात, असं संशोधनात आढळल्याचं अँड्रिया यांनी सांगितल आहे.
आपली प्रतिक्रिया द्या