आता ‘मेन टू’ चळवळीची गरज

50

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता करण ऑबेरॉयवर केले गेलेले बलात्काराचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत अभिनेत्री पूजा बेदी त्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर करणने बलात्कार केल्याचा आरोप एका अभिनेत्रीने केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी करणवरचे सगळे आरोप धादांत खोटे असल्याचे पूजा बेदीसह काही कलाकारांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आज ‘मी टू ’च्या नावाखाली अनेक पुरुषांना खोटय़ा प्रकरणात गोवण्यात येत असून करणसारख्या पुरुषांसाठी आता ‘मेन टू’ ही चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचे
मत पूजा बेदीने व्यक्त केले आहे.

पत्रकार परिषदेला करणची बहीण फॅशन डिझायनर गुरबाणी ऑबेरॉय, बॅड ऑफ बायजचे प्रतिनिधी सुधांशू पांडेय, शेरीन वर्गीश, चैतन्य भोसले आणि सिद्धार्थ हल्दीपूर हे उपस्थित होते. करणला खोडसाळपणे या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप यावेळी पजा बेदीने केला. करण अतिशय सज्जन माणूस असून तो असे करणार नाही याची आपल्याचा खात्री असल्याचा दावाही पूजाने यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या