श्री कृष्णाय नम:

आवडते दैवत कृष्ण असल्याने नेमबाज पूजा घाटकर कर्मयोगाच्या वाटेने निघाली आहे.

देव म्हणजे ? – एक शक्ती, जी आयुष्य घडवण्यासाठी  आपल्याला मदत करते.

आवडते दैवत ? – श्रीकृष्ण.

धार्मिक स्थळ ? – मथुरा.

आवडती प्रार्थना – भगवद्गीता

आवडता रंग ? – शुभ रंग पांढरा आणि लाल रंग माझ्या आवडीचा आहे.

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ?– भगवद्गीता वाचते.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – कर्मावर माझा खूप विश्वास आहे. आपण चांगलं केलं की, आपल्या आयुष्यात चांगलंच घडतं हे मी मानते.

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं ? – नेमबाजीचा सराव केला की, मला चांगलं वाटतं.

दुःखी असतेस तेव्हा ? – ध्यानधारणा करते, भगवद्गीता वाचते.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील ? –  प्रत्येकाच्या विचारावर हे अवलंबून आहे.

देवभक्त असावं, पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय ?– कारण प्रत्येक देवाच्या शक्तीवरच अवलंबून राहिलो तर आपण काम करणार नाही. त्याऐवजी काम केलं तरच देव आपल्याला साथ देईल.

उपवास करतेस का ? – नाही

कला आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – दररोज १५ मिनिटे देवाची पूजा करते. त्यामुळे मला खूप शांतता वाटते.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना ? – मला दोन्ही सारखेच वाटतात. मी कुठेही परदेशात गेले की, सोबत श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन जाते. तरीही आपण कधीही कुठेही प्रार्थना करू शकतो.