केरळला लाज वाटायला पाहिजे! मराठी अभिनेत्री संतापली

22122

एका गर्भवती हत्तिणीचा मृत्यू झाल्याच्या बातमीने प्राणीप्रेमी प्रचंड हळहळले आहेत. भूक लागल्याने ही हत्तीण अन्नाच्या शोधात फिरत होती. यावेळी काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला घातले. त्या मुक्या जनावराने अन्न मिळालं म्हणून आनंदात ते अननस खाल्ले. थोड्याच वेळात या हत्तिणीला त्रास व्हायला लागला. ती त्रास कमी व्हावा म्हणून नदीत जाऊन उभी राहिली, मात्र त्रास वाढत गेला आणि तिचा तिथेच मृत्यू झाला. याच घटनेमुळे मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री पूजा सावंत ही भयंकर चिडली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत ही मुक्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते. केरळमधली ही घटना वाचून, पाहून तिला भयंकर धक्का बसला आहे. पूजाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर या घटनेचा निषेध नोंदवणारी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की ‘प्राणी आपल्यावर भरवसा ठेवतात, मात्र आपण त्यांचे हाल करतो. केरळला लाज वाटायला पाहिजे. साक्षरतेमध्ये सर्वात पुढे असलेले हे राज्य दोन निष्पाप जिवांना वाचवू शकले नाही’

We certainly don’t deserve this earth.
Animals trust us for a cause and here we are breaking them into pieces
Shame on you Kerala..
Kerala’s high literacy rate couldn’t save two innocent lives

Posted by Pooja Sawant on Tuesday, June 2, 2020

पूजा सावंत ही दिसायला सुंदर तर आहेच शिवाय ती अभिनयातही उजवी आहे. चांगल्या अभिनयामुळेच तिला ‘जंगली’ या हिंदी चित्रपटात महत्वाची भूमिका मिळाली होती. विद्युत जामवालची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट वन्य प्राणी आणि माणसांमधील संबंधांवर बेतलेला होता. या चित्रपटानंतर पूजाने पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला होता. प्राण्यांचं प्रेम हे निर्व्याज असतं, मात्र मानवाने त्यांचे स्वत:च्या फायद्यासाठी शोषण केले आणि प्राणीसृष्टीला बरीच हानी पोहोचवली आहे असं पूजाचं म्हणणं आहे. हे बदलण्याची गरज आहे आणि यासाठी मी माझ्यापासून सुरुवात करत असल्याचं पूजाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पूजा ही सातत्याने प्राण्यांसाठी काम करत असते. प्राण्यांची सुटका करण्यापासून त्यांच्यावर उपचार करण्यापर्यंत पूजा सातत्याने पुढाकार घेत असते. स्वकमाईतील रक्कम ती प्राण्यांच्या भल्यासाठी वापरत असते. प्राण्यांसाठी काहीतरी करता यावे यासाठी आपण चित्रपटात काम करत असल्याचंही तिने म्हटलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या