शेतकरी मोर्चातून ‘शहरी माओवाद’ डोकावतोय!

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दोनशे किलोमीटरची पायपीट करत आज मुंबईत धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा भाजप खासदार पूनम महाजन यांनी शहरी माओवादाशी संबंध जोडून टाकला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सरकारने गंभीरपणे विचार केला पाहिजे असे सांगतानाच त्यांच्या मोर्चातून शहरी माओवाद डोकावतोय, असा आरोप त्यांनी केला. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. मोर्चात आलेल्यांच्या हातात कम्युनिस्टांचा लाल बावटा आणि डोक्यावर लाल टोपी आहे असे सांगतानाच शेतकऱ्यांचा वापर राजकीय अजेंड्यासाठी होता कामा नये, असे पूनम महाजन म्हणाल्या. आदिवासींवरही शहरी माओवाद्यांनी कब्जा केला आहे असा दावा त्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या