धक्कादायक! पॉर्न अॅडिक्ट मुलाने केला आईवर बलात्कार

210

सामना ऑनलाईन । पालनपूर

पॉर्न साईटच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातच्या पाटण शहरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला त्याच्या ४६ वर्षीय आईवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल असं या तरुणाचं नाव असून गुरुवारी रात्री ऑफिसवरून घरी आल्यावर पाणी पिण्याचा बहाणा करत तो आईच्या रुममध्ये शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पीडित महिलेने तक्रारीत दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राहुल पॉर्न साईटच्या आहारी गेला होता. तो दररोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहत असे. याआधीही राहुलने आईला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारणा केली असल्याची माहिती महिलेने तक्रारीत दिली आहे.

मुलानेच आपल्यावर बलात्कार केल्यामुळे त्या महिलेला मोठा मानसिक धक्का बसला होता. पीडितेने आपले पती आणि मोठा मुलगा यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलाविरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. याप्रकरणी राहुलला अटक करण्यात आली असून त्याची आणि पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या