‘गे’ स्टारला नकार देणाऱ्या पॉर्नस्टारचा संशयास्पद मृत्यू!

125
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

सिनेमात काम करणारी पॉर्न स्टार ऑगस्ट ‘एम्स कॅलिफोर्निया’मध्ये मृतावस्थेत आढळली आहे. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तिने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ऑगस्ट एम्सने गे पॉर्नस्टार्सविषयी सोशल मीडियावर वक्तव्य केलं होतं, त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या कारणामुळे ती मानसिक दबावाखाली आल्यानं तिने आत्महत्या केली असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

एम्सने काही दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं की, ‘मी त्या व्यक्तीसोबत शूट करणार नाही ज्याने गे पॉर्नमध्ये काम केलं आहे. मात्र गे पॉर्न स्टारसोबत काम करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा अंदाच व्यक्त केला जात आहे. त्यानंतर एम्सने आणखी एक ट्विट केलं होतं त्यात तिने लिहिलं होतं की, ‘मी होमोफोबिक नाही. सुरक्षेच्या कारणास्तव अनेकजण गे पॉर्नमध्ये काम केलेल्या मुलांसोबत शूटिंग करत नाहीत.’ मात्र ऑगस्ट एम्स होमोफोबिक म्हणजेच समलैंगिक समुदायाच्या विरोधात असल्याची टीका तिच्यावर झाली होती.

टीका झाल्यानंतर एम्सने स्पष्ट केलं की, ‘माझा उद्देश वाईट नव्हता. मात्र मी माझं शरीर धोक्यत टाकू शकत नाही.’ त्यामुळे एम्सचा मृत्यू नेमका कसा झाला आणि तिच्या मृत्यूचं कारण काय हे गुढ अद्याप कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या