चाहत्याने पॉर्नस्टारच्या पायाचा लचका तोडला आणि गिफ्ट म्हणून ठेवून घेतला

Photo credit - en.wikipedia.org

लिसा अ‍ॅन नावाच्या एका पॉर्नस्टारने चाहते कसे वागतात याबाबतची सत्यघटना सांगितली आहे. लिसाने एक पॉडकास्ट सुरू केलं आहे ज्याचं नाव ‘ड्यूड्स डू बेटर’ असं ठेवण्यात आलं आहे. यामध्ये लिसा तिच्या आयुष्यातील घटनांबद्दल सांगत असते. यातल्या एका भागामध्ये तिने एका माथेफिरू चाहत्याबद्दल सांगितलं आहे. तिचा हा चाहता लिसामागे इतका पागल झाला होता की तिची काहीतरी वस्तू आपल्याकडे असावी यासाठी त्याने तिच्या पायाचा कडकडून चावा घेतला होता. चावल्यानंतर तो तुकडा या चाहत्याने स्वत:जवळ ठेवून घेतला असं लिसाने सांगितलं आहे.

लिसा ही 49 वर्षांची झाली असून तिने 1997 साली पॉर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता, मात्र 2008 साली तिने पुन्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आपली कारकिर्द जबरदस्त यशस्वी होती असं लिसाने म्हटलं आहे. लिसाची हेजल मूरे नावाच्या मॉडेलने मुलाखत घेतली होती. यामध्ये तिने सांगितलं की चाहत्याने केलेल्या हल्ल्यानंतर ती इतकी घाबरली होती की तिने त्यानंतर स्वत:च्या सुरक्षेसाठी हत्यारबंद सुरक्षारक्षक ठेवायला सुरुवात केली. घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षारक्षक सतत आपल्यासोबत असतात असं तिने सांगितलं आहे. मी ज्या क्षेत्रात काम करते, तिथे असे प्रसंग कधीही घडू शकतात असं लिसाने म्हटलं आहे. लिसाचं म्हणणं आहे की पॉर्न चित्रपटात काम करणाऱ्या पुरुषांचं बाहेर कौतुक केलं जातं, मात्र महिलांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. लिसाने सगळ्या लोकांना आवाहन केलं आहे की त्यांच्या मुलांना इतर अभिनेत्यांना जो मान दिला जातो तोच मान पॉर्नस्टारलाही द्यायला शिकवलं पाहिजे.