पॉर्न व्हिडीओला ‘सबटायटल्स’ नाहीत, प्रेक्षकाने वेबसाईटला कोर्टात खेचले

1011

कोणत्याही वेगळ्या भाषेतल्या चित्रपटाला समजून घेण्यासाठी उपयुक्त गोष्ट म्हणजे उपशीर्षक किंवा इंग्रजीत सबटायटल्स. सबटायटल्समुळे विविध भाषेतील चित्रपट, वेबसीरीज यांचा आनंद घेता येतो. सबटायटल्स नसतील तर चित्रपटाचं कथानक समजत नाही, ही सर्वसामान्य बाब. पण, एका माणसाने चक्क पॉर्न व्हिडीओंना सबटायटल्स नसल्याने एका वेबसाईटला कोर्टात खेचलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यारोस्लाव सुरिज असं या माणसाचं नाव आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारा यारोस्लाव हा कर्णबधिर आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये काही वेबसाईट्सवर पॉर्न व्हिडीओ पाहिले. मात्र, त्यापैकी एकाही व्हिडीओखाली सबटायटल्स नव्हते. त्यामुळे त्याने तीन पॉर्न वेबसाईट्सविरुद्ध कोर्टात धाव घेतली. त्याने दाखल केलेल्या खटल्यानुसार, या वेबसाईट्स अमेरिकेच्या विकलांगांसाठी असलेल्या समानतेच्या कायद्याचा भंग करत आहेत.

एखादा अव्यंग माणूस जेव्हा व्हिडीओ पाहतो, तेव्हा त्याला ऐकू येत असतं. त्यामुळे तो त्या व्हिडीओचा आनंद घेऊ शकतो. मात्र, कर्णबधिर माणसं व्हिडीओंचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाहीत. हीच बाब पॉर्न व्हिडीओलाही लागू होते. त्यामुळे या वेबसाईट्सनी आपल्या व्हिडीओंच्या खाली सबटायटल्स देणं गरजेचं आहे. जर ते असं करत नसतील, तर ते विकलांगांप्रति भेदभाव करत आहेत, असा त्याचा अर्थ होतो, असं आपल्या याचिकेत यारोस्लाव याने म्हटलं आहे.

त्यामुळे या कंपन्यांनी आपल्याला याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यारोस्लावने केली आहे. दुसरीकडे, या तीन वेबसाईट्सची मालकी असलेल्या कंपनीच्या प्रवक्त्याने व्हिडीओखाली सबटायटल्स असल्याचा दावा केला असून ते पाहण्यासाठी विशिष्ट पर्याय निवडावे लागतात, असं स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या