ह्यॅ…ह्यॅ…ह्यॅ…करणारा चित्रपटातील जोकर पॉर्नसाईटवर ट्रेंडीगमध्ये

1787

बॅटमॅन या कॉमिक्स पात्राचा सर्वात मोठा शत्रू हा ‘जोकर’ आहे. डीसी कॉमिक्सने जोकर चित्रपटाची निर्मिती केली असून यामध्ये बॅटमॅनशी संघर्ष होण्याआधी जोकर कसा होता, तो खलनायक कसा झाला हे दाखवण्यात आले आहे. 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटातील ‘जोकर’ हा नायकापेक्षाही जास्त गाजला होता. या चित्रपटातील खलनायकावर चित्रपट निघावा अशी मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती. डीसी कॉमिक्सने जोआकीम फिनिक्स अभिनित जोकर चित्रपट तयार केला असून तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र हा जोकर बॉक्स ऑफिसपेक्षा पॉर्नसाईटवर जास्त धुमाकूळ घालायला लागला आहे. पॉर्न साईट बघणाऱ्यांच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

‘जोकर’ चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच पॉर्न वेबसाइटवर Joker असा शब्द शोधणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. ‘पॉर्न हब’ने ही आकडेवारी मांडली असून त्यांनी म्हटले आहे की ‘आमच्या सांख्यिकी तज्ज्ञांना असे आढळले आहे की, आमच्या वेबसाइटवर जोकर कीवर्ड शोधणाऱ्यांची संख्या फक्त चार दिवसांत 2,91,000 वरून थेट 7,41,000 पर्यंत पोहोचली आहे. केवळ या वेबसाईटवरच नव्हे, तर इतर अश्लील वेबसाइटच्या सर्च ट्रेंडमध्ये हा शब्द शोधला जात आहे. असं का होत आहे याचं कारण मात्र या वेबसाईटनी सांगितलेलं नाही. हा चित्रपट हिंदुस्थानात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने फक्त 7 दिवसात 32.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 17,00 कोटी रुपयांपेक्षा ही जास्त व्यवसाय केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या