धक्कादायक! विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार; नराधमांकडून ब्लॅकमेलचा प्रयत्न

2703

सध्या देशभरात बलात्कारांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बारावीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत नराधमांनी तिला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

मुलगी तिच्या मित्रासोबत निर्जन ठिकाणी गेली होती. तेथील शुकशुकटाचा फायदा घेऊन दोन नराधमांनी त्यांच्यावर हल्ला केला. मुलीला तिच्या मित्रासमोर विवस्त्र करून तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत मुलीच्या मित्राकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. मुलगा पैसे आण्यासाठी स्कूटरने घरी गेला. मुलगा गेल्यावर त्या नराधमांनी मुलावर सामुहिक बलात्कार केला. त्याचे आणि व्हिडीओही काढले.त्यानंतर त्यांनी पोबारा केला. तिचा मित्र परतल्यावर मुलीने घडलेली घटना त्याला सांगितली.

बदनामीच्या भीतीने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. मात्र, नराधमांकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तक्रार दाखल करून  मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. तपासणीमध्ये मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्ना झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासची सूत्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले असून त्यांनी दोन आरोपींना अटक केली आहे. रामबाबू सूर्यवंशी आणि राकेश राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या