कल्याणीनगर हिट ऍण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अशपाक मकानदार यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी हा आदेश दिला.
अगरवाल दाम्पत्य आणि मकानदारच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. अपघातानंतर अल्पकयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी अगरवाल दाम्पत्य आणि अशपाक मकानदार यांच्यामध्ये एक महत्त्काची ‘मीटिंग’ झाली होती. ही ‘मीटिंग’ नक्की कोठे झाली, तिथे कोण उपस्थित होते, न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याच्याशी संपर्क साधला होता का, याबाबत तपास करण्यासाठी आरोपी मकानदार याला तीन दिवसांची कोठडी द्यावी, तर अगरकाल पती-पत्नीला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी केली. अतिरिक्त सरकारी वकील अनिल कुंभार यांनी तपासातील प्रगती अधोरेखित केली. आरोपी मकानदार हा रक्ताचे नमुने बदललेल्या ठिकाणासह ससून रुग्णालय, येरकडा पोलीस ठाणे आणि बाल न्याय मंडळ येथे हजर असल्याचे सीसीटीक्ही चित्रीकरण क साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. पुरावा नष्ट करण्याकरिता डॉक्टरांना देण्यासाठी मकानदार याने घेतलेल्या चार लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये डॉ. श्रीहरी हाळनोरकडून जप्त करण्यात आले आहेत, परंतु उर्वरित एक लाख रुपये कोणाला दिले याबाबत तो माहिती सांगत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
अगरवाल दाम्पत्याच्या वतीने ऍड. प्रशांत पाटील, ऍड. अबीद मुलाणी आणि मकानदारच्या कतीने ऍड. प्रसाद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला.