सकारात्मक काळं मीठ

90
  • घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, घरात कौटुंबिक वाद होत असतील तर दररोज पाण्यात काळे मीठ घालून त्या पाण्याने लादी पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
  • घरात सगळ्यात नकारात्मक ऊर्जा बाथरूममध्ये असते. बाथरूममध्ये काचेच्या छोट्या बाऊलमध्ये उंचावर मीठ ठेवावे. ते जर भिजले तर त्या वाटीतले मीठ बदलायचे.
  • स्टीलच्या भांड्यात कधीही मीठ ठेवू नये. मीठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवायचे असते. त्यासोबत एक लवंग टाकायची. यामुळे घरात सुख समृद्धी नांदून पैशांची कमतरता पडणार नाही.
  • एखाद्या दिवशी मन बैचेन असेल,तर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालून आंघोळ करायची. त्यामुळे मानसिक बैचेनी कमी होते. ताजेतवाने राहाते.
  • सैंधव मीठाचा तुकडा घरातल्या कोपऱ्यात ठेवायचा, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहते.
आपली प्रतिक्रिया द्या