मुंबईत पुढील चार पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; ठाणे, नवी मुंबई, कोकणातही बरसणार सरी

1078

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली असली ,तरी येत्या चारपाच दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच घाट माथ्यावर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कासळण्याची शक्यता आहे.

पश्चिम किनारपट्टीजवळ कमी दाबाचे वारे एकत्र आल्याने मुंबई, उपनगरे आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या चार पाच दिवसात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे,नवी मुंबई, कोकणात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवडाभर मुंबई, ठाणे, पालधर, नवी मुंबई कोकणात पाऊस बरसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या