वांद्रे रेल्वे स्थानकाच्या टपाल पाकिटाचे आज प्रकाशन

175

मुंबईतील हेरिटेज वास्तूंपैकी एक असलेल्या वांद्रे रेल्वे स्थानक आता टपाल पाकिटाच्या स्वरूपात मुंबईकरांच्या समोर येत आहे. 23 ऑगस्टला दुपारी 3.30 वाजता वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांच्या हस्ते टपाल पाकिटाचे प्रकाशन होईल.

वांद्रे विधानसभा क्षेत्रातील वांद्रे रेल्वे स्थानकाला हेरिटेज दर्जा देण्यात आला आहे. रेल्वेने मध्यंतरी नूतनीकरण करून हेरिटेज वास्तूला झळाळी दिली. आता वांद्रे रेल्वे स्थानकाचा हेरिटेज ठेवा टपाल तिकिटाच्या स्वरूपात जपण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री व स्थानिक आमदार ऍड. आशीष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. 23 ऑगस्टला वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये आयोजित सोहळ्यात या टपाल तिकिटाचे प्रकाशन होईल. यावेळी स्वतः आशीष शेलार, खासदार पूनम महाजन आदी उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या