माय बाप्पा, माय स्टॅम्प

79

सामना प्रतिनिधी । मुंबई

भारतीय डाक विभागातर्फे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला असून सोमवार, 10 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता मंदिराच्या गाभाऱयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्टॅम्पचे शानदार प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित राहणार आहेत.

भारतीय डाक विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो श्री सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या