कंगनाच्या मणिकर्णिकाचं पोस्टर लाँच

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झालेल्या झाशीच्या राणीच्या आयुष्यावर चित्रपट येणार ही बातमी आधीच आली होती. अभिनेत्री कंगना राणौत अभिनित मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. क्रिश हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून शंकर-एहसान-लॉय यांचं या चित्रपटाला संगीत असेल.

राणी लक्ष्मीबाई उर्फ झाशीच्या राणीचा जन्म काशी येथील भदैनी इथे १८२८ मध्ये झाला. हिंदुस्थानचा पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १८५७च्या उठावात अतिशय तडफेने लढलेली एकमेव स्त्री क्रांतिकारी म्हणून त्यांचं नाव इतिहासात कोरलं गेलं आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या टीमने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात त्यांच्या जन्मस्थानापासून केली आहे. मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी हा चित्रपट पुढील वर्षी २७ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या