‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच

106

सामना ऑनलाईन । मुंबई

अतिशय वेगळ्या नावामुळे “खिचिक” या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, लक्ष वेधून घेणारं हे पोस्टर आहे. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असं हे पोस्टर असून नेहमीच्या धाटणीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळं दिसत असल्यानं ‘खिचिक’ लक्षवेधी ठरत आहे.

कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. योगेश कोळी यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून गुरु ठाकूर आणि दत्ता यांनी लिहिलेल्या गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाच्या नावातून नीटसं काही कळत नसल्याने चित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या