मानवी हाडांपासून बनलेले अजब बेट

33

सामना ऑनलाईन । पोवेग्लिया

पोवेग्लिया बेट आणि त्या बेटावरील मातीची सच्चाई समोर आली तेव्हा सारेच थक्क झाले होते. या बेटावरील ५० टक्के माती ही मानवी हाडांपासून तयार झालेली आहे. पोवेग्लिया बेट हे वेनिस आणि लिडो यांच्यामध्ये वसलेले आहे. इटलीतील वेनिसीया प्रसिद्ध कालव्याच्या उत्तरेला हे बेट आहे.

असं म्हणतात या बेटावर जाणारे कधीच परत येत नाहीत. १७ एकरवर पसरलेल्या बेटाच्या सर्व बाजूला भिंत बांधण्यात आली आहे. साधारण १४ व्या शतकात बेटाचा शोध लागला. नेपोलियन युद्धात ब्रिटीश सैनिकांनी फ्रेंच लोकांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी या बेटांवरील भिंतीचा वापर केला होता. प्लेगच्या रुग्णांना मरण्यासाठी पोवेग्लिया बेटावर आणून सोडायचे. तब्बल एक लाख ६० हजार जणांना अशा पद्धतीने बेटावर सोडून दिल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या