इराण-इराक सीमेवर ७.३ रिश्टरचा भूकंप, ३२८जण ठार

28

सामना ऑनलाईन । बगदाद

इराण-इराक सीमेवर रविवारी ७.३ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू इराण सीमेजवळील हालज्बा भागामध्ये जमिनीखाली ३३.९ किलोमीटरवर होता. या भूकंपामध्ये आतापर्यंत ३२८ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. भूकंपामुळे इराणमीधील अनेक गावं नष्ट झाली असून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानंतर याच भागाला भूकंपाचे ५० सौम्य धक्के बसले. सततच्या भूकंपांमुळे संपूर्ण परिसरात मोठी हानी झाली आहे.

iran-irak-1

भूकंपाचे धक्के इराण-इराकसह तुर्कस्तान, इस्रायल आणि कुवेतमध्येही बसल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे इराणमधील २० पेक्षा जास्त नागरी वस्ती असणारी गावं नष्ट झाली आहेत. या शक्तिशाली भूकंपामुळे संपूर्ण परिसरातील वीज आणि पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या हालांमध्ये आणखी भर पडली आहे. भूकंपानंतर इराणची आपातकालीन विभागाची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू करण्यात आहे. लोकांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या