घरगुती हिंसाचाराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, नेटिझन्सही सुन्न

1203

घरगुती हिंसाचार दाखवणारा एक व्हिडीओ सोशल माध्यमावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘अरेबिक अल आन’ या टीव्ही वाहिनीवर रिपोर्टरचे काम करणाऱ्या जेनन मॉस्सा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सच्याही डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘घरगुती हिंसाचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी हा व्हिडीओ शक्तिशाली आहे’, अशा कॅप्शनसह जेनन मॉस्सा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. एखाद्या स्त्रीला वैवाहिक आयुष्यामध्ये कितीदा अपमानकारक क्षणांचा सामना करावा लागतो हे या व्हिडीओतून दिसत आहे.

काय आहे व्हिडीओत…
व्हिडीओच्या सुरुवातीला एक स्त्री अत्याचारापूर्वी किती आनंदी जगत असते, फुलांसारखी प्रसन्न राहात असते हे दाखवण्यात आले आहे. यानंतर हळूहळू तिच्या चेहऱ्यावर, शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा दिसू लागतात. नाते टिकवून ठेवण्यासाठी ती तरीही त्या खुणा मेकअपचा वापर करून खुबीने लपवते. परंतु व्हिडीओच्या शेवटी स्त्रीच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव आणि प्रेमळपणाची जागा जखमा घेतात. शेवटी तिच्या डोळ्यात अश्रू तरळतात, असा हा ह्रदय हेलावून टाकणारा व्हिडीओ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या