प्रभासच्या आदिपुरुषमध्ये झळकणार ही अभिनेत्री, साकारणार सीतेची भूमिका

अभिनेता प्रभास याच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायणावर आधारित असणार आहे. नायक आणि खलनायक या मुख्य भूमिकांची घोषणा करण्यात आल्यानंतर नायिकेची भूमिका कोण करणार, याचे ठोकताळे मांडण्यात येत होते. मात्र आता ही भूमिका कोण करणार हे निश्चित झालं आहे.

आदिपुरुष या चित्रपटात प्रभास नायकाच्या भूमिकेत दिसणार असून लंकेश ही खलनायकी भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे. त्यामुळे नायिकेच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. यात यादीत कित्येक अभिनेत्रींच्या नावांवरून अंदाज बांधण्यात येत होते. त्यात अनुष्का शेट्टी, अनुष्का शर्मा, कीर्ती सुरेश, कियारा आडवाणी, उर्वशी रौतेला अशी अनेक नावं या स्पर्धेत होती.

पण या सगळ्यांना पाठी टाकत आता अजून एक नवीन नाव समोर येत आहे आणि ते आदिपुरुषसाठी निश्चित करण्यात आलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे क्रीती सेनन. बरेली की बर्फी, लुकाछुपी, पानिपत अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून आपली छाप सोडणारी क्रीती ही प्रभासच्या आगामी आदिपुरुषमध्ये झळकणार असून ती सीतेची भूमिका साकारणार आहे.


View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रीती सध्या राजकुमार रावसोबत ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपल्यानंतर ती जानेवारीपासून अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. त्याखेरीज ती भेडिया, मीमी अशा विविध चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या ऐतिहासिक- पौराणिक भूमिकेसाठी आपण उत्सुक असल्याचं मनोगत क्रीतीने व्यक्त केलं आहे.

प्रभास, सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला आणि ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट 3डी असून तो हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. आदिपुरुष हा 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

आपली प्रतिक्रिया द्या