प्रभास ठरला आशियातील हँडसम मॅन, अभिनेता विवियन डिसेना सातव्या क्रमांकावर

अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आशियातील सर्वात ‘हँडसम मॅन’चा किताब त्याने पटकावला असून या यादीत तो अक्वल स्थानी आहे. यादीतील टॉप-10 पुरुषांच्या यादीत हिंदुस्थानातील दोघांचाच समावेश असून टेलिव्हिजन अभिनेता विवियन डिसेना सातव्या क्रमांकावर आहे.

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे सुपरस्टार प्रभास केवळ हिंदुस्थानातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला आहे. 2017 साली आलेल्या ‘बाहुबली-2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचलेला कमाईचा रेकॉर्ड अद्याप कोणत्याही चित्रपटाला ब्रेक करता आलेला नाही. अभिनयासह आपल्या ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावामुळेही तो कायम चर्चेत असतो. त्याची फिमेल फॅन फॉलोइंग मोठी आहे.

प्रभासच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्याने नाग अश्विन यांच्या बिग बजेट चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. यात अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणदेखील झळकणार आहेत. याशिवाय रोमॅण्टिक ‘राधे श्याम’, अॅक्शनपट ‘सालार’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या