प्रभासचा आगामी चित्रपट ‘राधेश्याम’चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!

820

‘बाहुबली’ स्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता प्रभासाच्या असंख्य चाहत्यांना आहे. ही उत्सुकता अधिक न ताणता प्रभासच्या आगामी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले होते. आता ही उत्सुकता शमली असून त्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

‘राधेश्याम’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही गुलशन कुमार आणि टी-सीरीजची प्रस्तुती असून यूवी क्रिएशन्सद्वारे निर्मित आहे. आज चित्रपटाच्या निर्मात्यांकडून प्रभास आणि पूजा हेगडे यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून चित्रपटाच्या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे दिसत आहेत. ‘राधेश्याम’ हा बिग बजेट चित्रपट असून 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रभास अभिनित या चित्रपटामध्ये पूजा हेगडे, भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन अशा मोठ्या कलाकारांची फळी दिसणार आहे. ‘राधेश्याम’ची सिनेमॅटोग्राफी मनोज परमहंस यांची असून प्रोडक्शन डिजाइनर आरवीवीएंडर आहेत. कमल कन्नन यांनी वीएफएक्स प्रोड्यूसर म्हणून धुरा सांभाळली आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत ‘राधेश्याम’, यूवी क्रिएशन्स प्रोडक्शनचा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या