शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना जामीन

27

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. जैस्वाल यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली होती.

गेल्या आठवड्यात जुन्या शहरात धर्मांधांनी किरकोळ कारणावरून दंगल घडवून आणली. या दंगलीत शिवसैनिकांनी कित्येक पोलिसांना दंगलखोरांपासून जीव धोक्यात घालून वाचवले. मात्र हेच पोलीस उलटले आणि गृहखात्याच्या इशाऱ्यावरून त्यांनी हिंदूंवरच वरवंटा फिरवायला सुरुवात केली. रविवारी रात्री पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली दोन हिंदू तरुणांना ताब्यात घेतले. हे कळताच शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. हिंदू तरुणांना निष्कारण का गोवता, असा सवाल प्रदीप जैस्वाल यांनी करताच क्रांतीचौक पोलिसांनी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. या प्रकरणात प्रदीप जैस्वाल यांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर जैस्वाल यांनी जामिनासाठी अर्ज केला.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एच. एस. महाजन यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. जैस्वाल यांच्या वतीने अ‍ॅड. के. जी. भोसले यांनी बाजू मांडली. न्या. महाजन यांनी उभय बाजूचा युक्तिवाद ऐकून जैस्वाल यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला. सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील अ‍ॅड. अविनाश देशपांडे यांनी बाजू मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या