पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, प्रदीप शर्मा यांची रेडचिली आणि नेटफ्लिक्सला नोटीस

pradip sharma mumbai police encounter cop

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा क्लास ऑफ 83 चित्रपट येत्या 21 ऑगस्टला प्रदशित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दाखवण्याची मागणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केली आहे. शर्मा यांनी वकिल रिजवान मर्चंट यांच्या माध्यमातून रेड चिलीज इंटरटेन्मेन्ट, नेटफ्लिक्स, आणि लेखक सययद हुसेन जैदी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

प्रदीप शर्मा हे पोलीस सेवेत असताना लेखक हुसेन जैदी त्यांना भेटले होते. त्यांनी अंडरवल्ड शी संबंधित काही ऑपरेशनची माहिती शर्मा यांच्याकडे मागितली होती. शर्मा यांनी दिलेल्या माहितीवरून जैदी यांनी क्लास ऑफ 83 नावाचे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारावर क्लास ऑफ 83 हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात पोलिसांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केली जात असेल तर ते चुकीचे आहे. त्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवण्यात यावा अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. जर चित्रपट प्रदर्शनापूर्वी मला दाखविला नाही तर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्यासाठी न्यायालयात धाव घेईन आणि निर्मात्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल खटला दाखल करेन असे शर्मा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या