राणेंवर बोलण्यापेक्षा मला इतरही कामे आहेत, प्राजक्त तनपुरे यांची खोचक टीका

2828

माजी खासदार असणाऱ्या माणसाला कसे बोलावे हे समजत नाही, हे निलेश राणे यांच्याकडे बघितल्यानंतर दिसते. लहान मुलांचे काही ऐकू नका आणि त्यांना उत्तरही देऊ नका असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. राणे यांना उत्तर देण्यापेक्षा मला इतरही कामे आहेत अशी खोचक टीका उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. तनपुरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर राणे यांनी खालच्या पातळीवर टीका केली. ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन झाली नाही. त्यामुळे मी चांगल्या भाषेमध्ये त्यांना उत्तर दिले. मात्र त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली. राणे यांच्याकडून वापरण्यात येणारी भाषा ही संसदीय नाही, म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगितले की अशा लहान मुलांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नका. कोरोनामुळे या पुढील काळामध्येसुद्धा त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची काहीच गरज नाही, मला इतरही कामे आहेत असे तनपुरे म्हणाले. दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायचा की नाही याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या