विधानसभेला 50:50 फॉर्म्यूला, प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर

1137

लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढल्याचा दावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला नवीन ऑफर दिली आहे. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 50:50 फॉर्म्यूल्याची ऑफर आंबेडकर यांनी काँग्रेस नेतृत्वाला दिली आहे. 288 पैकी 144 जागा देण्याची तयारी आंबेडकर यांनी दाखवल्याचे वृत्त ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे 288 जागांपैकी फक्त 144 जागांसाठीचे उमेदवार आहेत, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी काँग्रेसला 50:50 फॉर्म्यूलाप्रमाणे 144 जागा देण्याची तयारीही त्यांनी दाखवली. तसेच वंचितची आपसोबतही आघाडीची चर्चा सुरू असल्याचेही वृत्त आहे.

40 जागांची होती ऑफर
याआधी लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जागा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. उलट आम्हीच काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली आहे. त्यांना आमची ऑफर मान्य असेल तर सोबत यावे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. रविवारी 28 जुलैला संभाजीनगरात पत्रकार परिषदेत ते हे म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या