जो न्याय याकूब मेमनला लावला तोच एकबोटे आणि भिडे गुरुजींना लावा-प्रकाश आंबेडकर

सामना ऑनलाईन, मुंबई

भीमा-कोरेगाव इथे भडकलेल्या दंगलीसाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे ‘गुरूजी’ यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांची आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, ज्यामुळे राज्याच्या विविध भागात आंदोलनं केली जातायत.

आंबेडकर यांनी मागणी केली आहे की जो न्याय याकूब मेमनला लावण्यात आला, तोच न्याय भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंना लावावा. याकूब हा कटात सहभागी नव्हता मात्र त्याच्याविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला फासावर लटकवण्यात आलं. त्याचप्रमाणे भिडे गुरूजी आणि एकबोटेंविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे.