न खाता पिता 75 वर्षे जगलेल्या प्रल्हाद जानी यांचे 90 व्या वर्षी निधन

2756

विज्ञानासाठी एक कोडे ठरलेले प्रल्हाद जानी उर्फ चुंदरीवाले माताजी यांचे मंगळवारी निधन झाले. जानी गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी होते. गेले काही दिवस त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांची कोरोना टेस्टही निगेटिव्ह आली. मंगळवरी गांधीनगरमध्ये त्यांचे निधन झाले.

प्रल्हाद जानी यांनी 75 वर्षे काहीच खाल्ले नव्हते किंवा पाण्याच्या थेंबालाही स्पर्शही केला नव्हता. त्यांचे शरीर हे विज्ञानासाठी एक कोडे होते ते कधीच सुटले नाही. एखादा माणून न खाता पिता, मलमूत्र विसर्जन न करता कसा काय जिवंत राहू शकतो असा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला. तेव्हा अहमदाबादच्या काही डॉक्टरांनी त्यांना 15 दिवस 24 तास निगराणी खाली ठेवले. जानी यांनी 15 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नव्हता.

संशोधक आणि शास्त्रज्ञांनी याचा खूप शोध घेतला. याचा जर शोध लागला तर अंतराळात जाणारे , दुर्गम ठिकाणी जाणारे आणि देशाच्या सीमेवर तैनात असणार्‍या जवानांसाठी याचा खूप फायदा झाला असता. परंतू खूप संशोधन करून याचे उत्तर मिळाले नाही आणि त्यांच्या शरीराचे रहस्य त्यांच्यासोबत गेले.

आपली प्रतिक्रिया द्या