बेपत्ता असलेली बोट सापडली, २० खलाशी सुखरुप!

25
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । पालघर

पालघरच्या समुद्रात २० खलाशांसह एक बोट बेपत्ता झाली होती. ही बेपत्ता बोट सापडली असून बोटीवरील सर्व २० खलाशी सुखरुप असल्याची माहिती कळते आहे. मात्र अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

बुधवारी गुजरातमधील रामप्रसाद बोट बुडाली होती. त्यातील दहा खलाशी बेपत्ता झाले होते. त्या १० खलाशांना वाचवायला आणखी १० खलाशांची प्रेमसाई नावाची बोट गेली होती. मात्र ही बोट बेपत्ता झाली. कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. तब्बल १० तासांनंतर तारापूर पासून ३५ मैलांवर ही बोट सापडली. कोस्टगार्ड दमण एयरक्रॉफ्टने या बोटीचा शोध घेतल्याची माहिती मिळते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या