प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

976

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांना सोमवारी नवी दिल्लीतील आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आाले. त्यांच्या मेंदूमध्ये गाठ होती. त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी 84 वर्षीय मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचीही लागण झाली आहे. सोमवारी त्यांनीच ट्विटवरून ही माहिती दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या