जेव्हा राष्ट्रपतींचे आधार कार्ड हरवते…

10
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रपती भवनात सध्या जोरदार शोधमोहीम सुरू आहे. कर्मचारी भवनातील १२ खोल्या, त्यातील कपाटं, टेबलं यांची वारंवार तपासणी केली जात आहे. पण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आधारकार्ड काही केल्या सापडत नाहीये. कुठं ठेवलं, कशातं ठेवलं हे कोणालाही आठवत नसल्याने सगळ्यांची मोठी पंचाईत झाली आहे.

राष्ट्रपतींच्या आधार कार्डची डुप्लिकेट कॉपी मिळवणं तसं अवघड काम नाहीये. पण त्याला थोडा अवधी लागणार असल्याने आधार कार्डची मूळ प्रत शोधण्यात कर्मचारी रात्रीचा दिवस करत आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपत आहे. १७ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणुका घेण्यात येणार असून २० जुलैला त्याचा निकाल आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २८ जून आहे. अशावेळी मुखर्जी यांचे आधार कार्ड शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांची एवढी पळापळ का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या