आवडतं ते खा… पण थोडं थोडं खा… – प्रशांत दामले

खायला काय आवडतं?

व्हेजमधले सगळे पदार्थ

चमचमीत की साधं?

चमचमीत खायला जास्त आवडतं.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?

खाताना एकाच वेळी एकदम भरभरून न खाता थोडं थोडं खायचं. मग बरं वाटतं.

डाएट करता का?

नाही.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?

दौऱ्यावर असतो तेव्हा बाहेरच खावं लागतं. मुंबईत असेन तर मी घरीच जेवतो.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?

ठराविक हॉटेल ठरलेलं नाही. जिथे दौरा असेल तिथल्या कुठल्याही हॉटेलात खातो.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?

साधं जेवण. भात, भाजी, पोळी, आमटी

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी?

बरेचसे शाकाहारी पदार्थ मला बनवता येतात. रताळ्याची कचोरी मला आवडते. त्याकरिता एक वाटी चिरलेली कोथिंबीर, एक वाटी खिसलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम बेदाणे, मीठ आणि साखर या पदार्थांचे सारण तयार करावे. २५० ग्रॅम रताळी, एक बटाटा उकडून, सोलून, कुस्करून पुरण यंत्रातून काढून थोडेसे मीठ घालून मळावे. अर्धा चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतवून घ्यावेत. नंतर पातेले गॅसवरून उतरवून सारणाचे साहित्य त्यात घालून सारण तयार करावे. मळलेल्या पिठाची पारी करून त्यात थोडेसे सारण घालून कचोऱ्या तयार करून ठेवाव्यात. हव्या त्या वेळी वरी किंवा तांदळाच्या पिठात घोळवून तळाव्यात. गरम छान लागतात आणि उपवासाच्या दिवशीही खाता येतात.

आपली प्रतिक्रिया द्या