प्रताप सरनाईकांना ईडीकडून जप्तीची नोटीस, कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय

अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना नोटीस पाठवली आहे. ठाणे आणि मीरारोड येथील दोन मालमत्ता जप्त केल्याच्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. नोटी प्राप्त झाल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण करत असल्याचे सरनाईक म्हणाले आहेत. जप्तीच्या कारवाईविरोधात 30 दिवसांच्या आत न्यायालयात अपील करणार असल्याचेही ते म्हणाले.