लुडो खेळात महिलेने स्वत:लाच ठेवले गहाण, पतीला दिली धमकी

उत्तर प्रदेशातील प्रतापगढमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने पतीच्या अनुपस्थित घरमालकाशी लुडो खेळली आणि जेव्हा पैसे संपले त्यावेळी महिलेने स्वत:लाच गहाण ठेवले आणि खेळात हरल्यानंतर असे कृत्य केले.

महिलेचा नवरा रामपुर बेल्हाचा रहिवासी आहे. त्याचे लग्न अमेठी येथे झाले असून त्यांना दोन मुलं आहेत. पिडीत पतीने दावा केला आहे की, तो देवकली येथे भाड्याच्या घरात राहत होता. सहा महिन्यांपूर्वी तो कामासाठी राजस्थानातील जयपूर येथे गेला होता. तिथून पोटाला मारुन जास्तीत जास्त पैसे तो बायकोसाठी पाठवत होता. तेच पैसे ही महिला रमालकासोबत जुगारात उडवत होती. पैसे संपल्यानंतर या महिलेने स्वत:लाच डावावर लावले आणि हरली.

या घटनेची माहिती जयपूर येथे मजुरी करणाऱ्या पतीला महिलेने फोनद्वारे दिली. त्यात ती म्हणाली, मी स्वत:ला लूडोमध्ये हरले. आल्यावर हिशोब चुकता करुया. शिवाय आमच्या चक्करमध्ये पडलात तर कापून फेकून देऊ असे धमकावले. त्यानंतर पती परदेशातून परतल्यानंतर  त्याने पोलीस ठाणे गाठून पत्नीविरोधात तक्रार केली. शिवाय सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी प्रचंड व्हायरल होत आहे.