लूडो खेळात गहाण राहिलेल्या महिलेने दिली धक्कादायक बातमी, नवा ट्विस्ट

घरमालकासोबत लुडोत हरलेल्या महिलेने पैसे संपल्यावर स्वत:ला गहाण ठेवल्याची बातमी नुकतीच झाली आणि त्यानंतर महिलेच्या पतीने पोलीसात धाव घेतली. यामध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. पण महिलेला विचारल्यानंतर धक्कादायक बातमी समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये एक महिला आपल्या घरमालकासोबत पतीच्या अनुपस्थितीत लुडो खेळत होती आणि जेव्हा पैसे संपले त्यावेळी तिने स्वत:लाच गहाण ठेवले. तिच्या पतीने त्याचा व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यावेळी पिडीत पतीने पोलिसात धाव घेतल्याने पोलिसांनी पत्नी रन्नूला बोलावले. दोन दिवसांपूर्वी पति उमेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करुन पत्नी रन्नूवर आरोप लावला होता की, लूडो खेळताना पत्नीने स्वत:लाच गहाण ठेवले आणि ती घरमालकासमोर हरली. उमेशने आरोप केला होता की तो परदेशातून कमावून तिला पैसे पाठवतो आणि ती पैसे जुगारात उडवते. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ दखल घेत महिलेला बोलावून घेतले आणि नवा ट्विस्ट समोर आला. पत्नीने जुगार ती नाही तर तिचा पतीच खेळत असल्याचे सांगितले. आता पोलीस खरं खोटं करण्यासाठी महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. महिलेचा नवरा रामपुर बेल्हाचा रहिवासी आहे. त्याचे लग्न अमेठी येथे झाले असून त्यांना दोन मुलं आहेत. पिडीत पतीने दावा केला आहे की, लुडोत हरल्यानंतरप पत्नी घरमालकासोबत राहत होती. त्याने बराच समावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकली नाही.

सिओ सिटी सुबोघ गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश याची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आरोप लावला आहे की, त्याची पत्नी घरमालकासोबत लुडो खेळताना पैसे हरली. पैस हरल्यानंतर घरमालकाकडे स्वत:लाच गहाण ठेवले. मात्र चौकशी केली असता महिला लादी, कचरा करुन जीवन जगत आहे तर दोघांमध्ये आलबेल नाही. उमेशने पोलिसात धाव घेतल्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. जुगार तिचा पती खेळतो ती नाही. ती झाडू कचरा करुन तिच्या दोन मुलांचे पोषण करत आहे. आता पोलीस तिच्या नवऱ्याचा शोध घेत आहेत.