ड्रग्ज प्रकरणात कंगनाचीही चौकशी करा, भाजपची मागणी

kangana-ranaut-slams-sonam

अभिनेत्री कंगना राणावत हिने आपण ड्रग्ज घेतो असे सांगितले असेल तर तिचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. कंगनाला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले तर कोणाच्याही पोटात दुखण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

प्रविण दरेकर यांनी पुण्यामध्ये प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. आपण ड्रग्ज घेत होतो असे कंगनाने एका व्हिडीओत सांगितले आहे याकडे पत्रकारांनी प्रवीण दरेकर यांचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले की. कंगना जर असे बोलली असेल तर तिचीही चौकशी व्हायला हवी.जो न्याय इतरांना तोच न्याय कंगनाला लागू होतो. ती जर असे बोलली असेल तर तिची 100 टक्के चौकशी व्हायला हवी. आमची काहीही हरकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आपली चित्रपटसृष्टी वैभवशाली आहे आणि नवोदित कलाकार अंमली पदार्थांच्या आहारी जात असतील तर ते कोणत्याची हिताचे नाही. अंमली पदार्थांचे सेवन केवळ कलाकार नव्हे तर कोणाच्याही हिताचे नाही. मात्र कंगनाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील अंमली पदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंमली पदार्थांचा विळखा चित्रपटसृष्टीला पडायला नको. यामध्ये कोणालीही पाठीशी घालायला नको. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची गरज नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या