शब-ए-बारात घरीच साजरी करा, मुस्लिम धर्मगुरूंचे आवाहन

1016

संपूर्ण जगात कोरोना विरोधात युद्ध सुरू आहे. देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. 9 एप्रिल रोजी मुस्लिम समुदायाचा शब-ए-बारात हा सण आहे. या दिवशी आपल्या पुर्वजांसाठी प्रार्थना केली जाते. आपल्या पुर्वजांच्या कबरीवर जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. परंतु या दिवशी मुस्लिम बांधवांनी आपल्या घरीच राहून प्रार्थना करावी असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे. सोशल डिस्टसिंग पाळावे असेही सांगितले आहे. तसेच कबरस्तानमध्ये न जाण्याचा सल्लाही धर्मगुरूंनी दिला आहे.

दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीचे शाही मौलाना मुफ्ती मुकर्रम अहम म्हणाले की शब्बे ए बारात ची रात्र पवित्र असते. त्या दिवशी कबरीस्तानमध्ये जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लिम बांधवांनी घरीच राहून प्रार्थना करावी. तसेच आपले नातेवाईकांसह देश आणि जगासाठी प्रार्थना करावी असेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण घरीच राहिले पाहिजे आणि कायद्याचे पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या