झाकीर नाईकचे विषारी फुत्कार टाकणारे तोंड बंद, मलेशिया पोलिसांची कारवाई

993

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत मलेशियाने झाकीर नाईकच्या धार्मिक उपदेश देण्यावर बंदी आणली आहे. मलेशियातील ‘मलय मेल’मधील वृत्तानुसार सरकारकडून पोलिसांना परिपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये झाकीर यांच्या कार्यक्रमांवर बंदी असल्याचे म्हटले आहे. रॉयल मलेशिया पोलीसच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख दातुक असमावती अहमद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हिंदुस्थानमध्ये कारवाई होण्याच्या भितीने मलेशियात आश्रय घेणाऱ्या झाकीर नाईकला तेथील सरकारने चांगलाच दणका दिला आहे. मलेशियात राहणाऱ्या हिंदू धर्मियांच्या विरोधात विधान केल्यानंतर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

‘मलय मेल’मधील वृत्तानुसार नाईक आता आपला बचाव करण्यासाठी तिथे कायदेशीर लढाई लढतो. एका लॉ फर्मकडून त्याने अवमान केल्याप्रकरणी नोटीस धाडली आहे. तसेच आपल्यामूळ विधानाशी छेडछाड केल्याचा आरोप त्याने केला आहे. मात्र आता त्याच्या कार्यक्रमांवरील बंदीच्या निर्णयावर मलेशिया सरकार ठाम आहे. स्थानिक देखील झाकीर नाईच्या विरोधात कडक कारवाईची मागणी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या