
दिवाळी आली आणि घराघरात साफसफाईला सुरुवात झाली. पण ही सफाई करताना स्वतःचे घर स्वच्छ कराच, पण तो कचरा बाहेर फेकताना काळजी घ्या.
> सॅनिटरी नॅपकीन्स, लहान मुले व आजारी माणसांसाठी वापरण्यात येणारे हगीज उघडय़ावर कुठेही न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी.
> तुटलेल्या काचेच्या वस्तू कचऱ्यात टाकताना काळजीपूर्वक टाका. कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला काचा लागणार नाहीत. तसेच या काचा तशाच टाकल्या की तेथील प्राण्यांनाही लागण्याची शक्यता असते.
> उरलेले अन्न कुठेही फेकू नये. परिसरात दुर्गंधी पसरेल.
> उघडय़ावर कचरा फेकू नका. तुम्ही प्रवासात असाल तर एका पिशवीत कचरा ठेवून घरी आल्यावर तो कचरापेटीत टाका.
> मच्छीच्या कचऱ्याचा घरात दुर्गंध येईल म्हणून बाहेर कुठेपण कचरा न फेकता तो व्यवस्थित बंद करून फेकावा.
> घरातील पाळीव प्राण्यांना रस्त्यावर टॉयलेटसाठी आणण्यापेक्षा त्यांना टायलेट ट्रेनिंग द्यावे.
> घरात गळका माठ असेल तर तो रस्त्यावर फेकून न देता त्यात छानसे रोपटे लावू शकता.
> बाजारात जाताना कापडी पिशवी न्यावी. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर जास्त होणार नाही.
> बागकामाची आवड असेल तर ओला-सुका कचरा वेगळा करून खतनिर्मिती केली पाहिजे.