चिंब भिजा पण काळजीही घ्या !

<<डॉ. विजय दहिफळे>>

 • पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो, पण या ऋतूत विशेष काळजी घेतल्यास आजार होणार नाहीत. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पाऊस म्हटलं की, भिजणे आलेच. कामावर जाताना, शाळेत जाताना या ना त्या कारणाने घरातून बाहेर पडल्यावर थोडय़ा प्रमाणात भिजणे हेतेच. मग ओले कपडे तसेच अंगावर ठेवले तर आजारांना निमंत्रणच… पावसाळ्यात साथीचे अनेक आजार डोके वर करतात. त्यामुळे पावसात वारंवार भिजणे टाळावे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते.

काय करावे?

 • सफरचंद, डाळिंब, केळं, लिची अशी ऋतुमानानुसार फळं खावीत.
 • जेवणात तुपाचा समावेश करावा.
 • शरीराला ऊब मिळण्यासाठी गवती चहा प्यावा.
 • पावसाळ्यात कारले, रानभाज्या खाव्यात. ते अनेक संसर्गापासून दूर ठेवतात.
 • नोकरीवर जाणाऱयांनी कामाला जाताना ऑफिसमध्ये कपडय़ांचे जादा जोड ठेवावेत.
 • मधुमेही रुग्णांनी पावसात जास्त काळजी घ्यावी. बाहेरून आल्यावर पाय धुऊन कोरडे करावेत.
 • पावसात बूट वापरणे शक्यतो टाळा. बुटांमध्ये पाणी साचून राहते आणि त्याचा त्रास होतो. केस ओले ठेवू नयेत. कारण त्यामुळे ताप येतो.
 • पावसात कपडे लवकर वाळत नाहीत. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर घरी आल्यावर अंतर्वस्त्र्ा बदलणे आवश्यक आहे.
 • भिजून आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.
 • नाकावर कपडा बांधायलाही हरकत नाही.
 • जेवणात कडू भाज्यांचा समावेश करावा.
 • नियमित नखे कापावीत.
 • आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे.
 • विंडचिटर, रेनकोट कोरडे करून घालावेत.
 • छत्रीसाठी बॅगेत छत्रीसाठी पिशवी ठेवावी.
 • नियमित रुमाल बदलावा.
 • लेदरच्या वस्तू पावसात वापरू नयेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या